Top News

IPL क्रिकेटवर ऑनलाइन जुगार घेणाऱ्या 5 आरोपीना अटक. #Arrested


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे IPL अनेक देशातील खेळाडू यामध्ये सहभागी होत, वेगवेगळ्या टीम मध्ये खेळत असतात, क्रिकेटच्या या महासंग्रामात खेळण्यासाठी क्रिकेटपटू कोट्यवधी रुपये घेतात, हे तर मैदानावरील खेळाडू झाले मैदानाबाहेरील खेळाडू या खेळावर हजारो कोटी रुपयांचा जुगार खेळतात.
11 ऑक्टोम्बरला रामनगर पोलिसांना IPL क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांची गोपनीय माहिती मिळाली, स्थानिक गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे यांनी बंगाली कॅम्प, शांतीनगर परिसरात राहणाऱ्या सत्यजित निरंजन सरकार ह्याला क्रिकेटवर ऑनलाइन जुगार घेताना व लावताना अटक केली.
आरोपी सरकार जवळील मोबाईल तपासून बघितला असता त्यामध्ये ऑनलाइन ऐप च्या माध्यमातून बेकायदेशीर क्रिकेटवर ऑनलाइन जुगार खेळत होते. आरोपीने 12 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत 31 हजार 499 रुपये IPL क्रिकेटवर पैसे लावून कमविले.
ऐप ची लिंक कुठून आली याबाबत आरोपीची चौकशी करण्यात आली असता सरकारने सदर लिंक ही घुघुस, शेगाव व गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथून पाठवीत येत असल्याची माहिती दिली.
रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातून 2 आरोपी, घुघुस व शेगाव वरून 2 आरोपिंना अटक करण्यात आली.
यामध्ये सत्यजित निरंजन सरकार, तन्मय रणजित मंडळ दोन्ही रा. बंगाली कॅम्प, निलकमल निखिल कर्मकार, नेताजी नगर चामोर्शी, अमित जयप्रकाश वर्मा घुघुस, नावीस देवराव नरड शेगाव यांचेंजवळून पोलिसांनी 2 लाख 69 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सर्व आरोपींवर जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोनि मधुकर गिते, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पो हवा . रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे , नापोशि / पुरूषोत्तम चिकाटे, किशारे वैरागडे, पेतरस सिडाम, संजय चौधरी, विनोद यादव, पांडुरंग वाघमोडे , निलेश मुडे, सतिश अवथरे, लालु यादव , विकास जुमनाके, संदिप कामडी, माजीद पठान, हिरालाल गुप्ता, मनापोशि भावना रामटेके यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने