Top News

पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळ जखमी. #Tigerattack


पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील भटारी गावातील नाल्यालगत मेंढपाळ करणाऱ्या रामपुर दीक्षित गावातील एका इसमावर वाघानी हल्ला केल्याची घटना दिनांक ३० ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा पासून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या पोंभूर्णा परिक्षेत्रातील केमारा बिटातील भटारी गावानजीक कक्ष क्रमांक ११२ नजीकच्या शेतशिवारातील नाल्यालगत  शेळ्या - मेंढ्या चारत असलेल्या मेंढपाळावर पट्टेदार वाघाने अचानक हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना ३० आक्टोंबरला १०:३० वाजता घडली.  जखमी झालेला मेंढपाळ रामपुर दीक्षित येथील रहिवासी असून संदीप रामजी शामावर वय ४२ वर्षे असे जखमी झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच पोंभुर्णा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे , वनक्षेत्र अधिकारी आनंदराव कोसरे, वनरक्षक शितल कुळमेथे, वनरक्षक राजेंद्र मेश्राम, वनरक्षक प्रशांत शेंडे व वनकर्मचारी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली. सदर घटनेचा पंचनामा करण्यात आले असून पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने