शाळा व्यवस्थापन समिती चेक आष्टा च्या अध्यक्षपदी संतोष बोंडे तर उपाध्यक्षपदी सविता मडपती यांची निवड. #Selection

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- आज दि. ३० ऑक्टोबरला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात मागील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी नवीन अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली
त्यात शाळा व्यवस्थापन समिती चेक आष्टा च्या अध्यक्षपदी संतोष बोंडे तर उपाध्यक्षपदी सविता मडपती, सचिवपदी मुख्याध्यापक अरुण यामावार तर सदस्यपदी नंदकिशोर पोतराजे, रविंद्र मडावी, रेखा कोसरे, रंजना दिवसे, दिपीका मरस्कोल्हे, प्रभाकर मरस्कोल्हे, जया सोनटक्के यांची निवड करण्यात आली.
निवडीबद्दल ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य जयंत पिंपळशेंडे, आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक भैरव दिवसे, ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई बोडेकार, ग्रामपंचायत सदस्य जीवनदास कुंभरे, गजानन वाढई, विलास निखाडे तसेच गावातील नागरिक आणि युवकांनी अभिनंदन केले.