चंद्रपूर जिल्ह्यात ट्रेडविन कडून गुंतवणूकदारांची अडीच कोटींची फसवणूक. #Cheating


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून ट्रेडविन मल्टीसर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने जाळ तयार करीत अनेकांना कमी वेळात दाम दुप्पटीचे आमिष दाखविले व नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावत पसार झाले.
फसवणुकीच्या या प्रकरणात सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये 8 ऑक्टोबरला कंपनी विरोधात गुंतवणूकदारांनी तक्रार दिली असून सिंदेवाही पोलिसांनी कलम 420, 406, 409, 120 (ब) भांदवी सहकलम 3 व 4 महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 अनव्ये कंपनीचे संचालक शेखर निबाजी साखरे व इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या तिघांनी गुंतवणूकदारांची तब्बल 2 कोटी 84 लाख 8 हजार 600 रुपयांची फसवणूक केली.
चंद्रपूर जिल्ह्यात ज्या गुंतवणूकदारांची ट्रेडविन कंपनी कडून फसवणूक झाली असल्यास त्यांनी आपले आधार कार्ड व बँक पासबुक सहित गुंतवणूक संबंधात असलेले कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखा, दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या बाजूला येथे माहिती देत पुरावे सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत