राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शहर अध्यक्षला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक. #Arrested

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची शहर अध्यक्षला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आपल्या दोन साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. वैष्णवी देवतळे असे या युवती प्रमुख कार्यकर्तीचे नाव आहे.
एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. संधी साधून वाहनावर स्वतः बसून दूरपर्यंत ढकलत नेण्यात येत होते. नंतर साथीदारांच्या सहाय्याने निर्जनस्थळी जात मेकॅनिक साथीदाराच्या सहाय्याने गाडी सुरू करून विक्री केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
एकूण 11 मोपेड वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीकडून जप्त केली आहेत. टोळीकडून अन्य काही ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीसांनी वैष्णवीसह मनीष पाल, सौरभ चंदनखेडे अशा तीनही आरोपींची कोठडी मिळविली आहे. #साभार