पेट्रोल डिझेलवरील अतिरिक्त सेस आघाडी सरकारने कमी करावा.#Petrol

सुभाष कासनगोट्टूवार यांची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- देशात जिथे जिथे भाजपशासित राज्ये आहेत. त्या त्या राज्यात पेट्रोलचे दर मोठ्या फरकाने कमी होत आहेत. त्याच आधारावर महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट व अतिरिक्त सेसचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री सुभाष कासनगोटूवार यांनी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलिटर तर झेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रति लिटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल १२ रुपये स्वस्त झाले आहे. मोदी सरकारने ज्याप्रकारे पेट्रोल डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री सुभाष कासनगोटूवार यांनी केली आहे.
राज्यात डिझेलवर २४ टक्के तर पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो. पेट्रोलवर प्रति लिटर नऊ रुपये सेस आहे. यात दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रति लिटर सेसचा समावेश आहे . राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी ३० ते ४० रुपये प्रति लिटर मिळतात . सरकारने पेट्रोल व डिझेलवरील दुष्काळी सेस रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.#petrol

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत