Top News

3 युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले. #Accident


एक जागीच ठार; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू.

एकावर गडचिरोलीत उपचार सुरू.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
चंद्रपूर:- चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर माॅर्निंग वाॅकसाठी गेल्या 3 तरूणांना अज्ञात वाहनाने जबर धडक देत चिरडल्याची घटना आज सोमवारी ( 15 नोव्हेंबर 2021) सकाळी चूनारकर पेट्रोल पंपा जवळ घडली. या घटनेमध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍याचा गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मृतांची संख्या दोन झाली आहे. एका गंभीर जखमीवर उपचार सुरू आहे. दीपक दादोरिया व अंकुश सोयाम असे मृतांचे नाव आहे. दोघेही व्याहाड (बुज) येथील रहिवासी होते.
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील ग्रामीण भागातील नेहमीच बरेच तरूण माॅर्निंग वाॅकला जात असतात. आज सोमवारी (15 नोव्हेंबर 2011) ला व्याहाड (बूज) येथील 3 तरूण एकत्र मिळून माॅर्निंग वाॅकला गेले होते. दरम्यान त्याच मार्गाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्या तरूणांना जबर धडक देत चिरडले. ही घटना चूनारकर पेट्रोल पंपा जवळ घडली. दिपक दादोरीया या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अंकुश सोयाम, अक्षय रामटेके हे दोघे जण गंभीर जखमी झाले.
जखमींना गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अंकुश सोयाम या तरुणाचा मृत्यू झाला असून अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. दोघेही व्याहाड बुज येथील रहिवासी होते. तर एका जखमीवर उपचार सुरू आहे. व्याहाड बूज येथे या घटनेने शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने