गोंडपिपरी तालुक्यात भुकंपाचे सौम्य धक्के. #Earthquake

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी, गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरातील काही गावात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. घरातील वस्तू अचानक हलू लागल्याने नागरिक घराबाहेर आल्याची माहीती आहे.

🐕वासनेची भूक मिटवण्यासाठी कुत्रीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक.
👇👇👇👇👇👇
दरम्यान अद्यापतरी मालमत्तेचा कुठल्याच नुकसानीची माहीती समोर आली नाही.दरम्यान भुकंपाचा धक्कामुळे नागरिक दहशतीत आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात रविवारला 6.48 वाजताचा सूमारास भुकंपाचे धक्के जानवले.अनेकांनी घराबाहेर येवून मोकळ्या जागेत आसरा घेतला. तालुक्यातील घडोली, साई नगरी येथे भुकंपाचा धक्के आनेकांनी अनुभवले. अहेरी उपविभागातील काही गावात भुकंपाचा धक्याची तिव्रता अधिक होती. महाराष्ट्रातील अहेरी, गोंडपिपरी आणि तेलंगणा मधील बेल्लमपल्ली, आदिलाबाद आदी भाग भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. अहेरी उपविभागातील आष्टी, अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदगाव,बोरी, राजाराम,गोंडपिपरी तालुक्यातील घडोली,साई नगरी येथे भूकपांचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील नागरिक बाहेर आल्याची माहिती देण्यात आली.