Top News

मला माझी शेती वाहू द्या. #Bhadrawati


वृद्ध शेतकऱ्याची पत्रपरिषदेत मागणी.
भद्रावती:- मला माझी शेती वाहू द्या अशी मागणी ८२ वर्षीय वृद्ध शेतकरी महादेव वरारकर यांनी पत्रपरिषदेत केली. पत्रपरिषदेत महादेव वरारकर यांनी सांगितले की, मी आणि माझे भाऊ वासुदेव वरारकर यांच्या नावाने मौजा घोनाड येथे साजा क्र. २९ मध्ये १८ एकर जमीन आहे. २०१० मध्ये वासुदेव वरारकर यांचे निधन झाले. त्यानंतर शेतीच्या आवश्यक दस्तऐवजावर वारसानांची नावे चढविण्यात आली. त्यात गडबड झाल्याने आपसी समझोता करून प्रकरण मिटविले.
दरम्यान पुतण्या भास्कर वरारकर याने कोणत्याही प्रकारचा फेरफार न घेता सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक खोब्रागडे यांना विकली असाही आरोप महादेव वरारकर यांनी पत्रपरिषदेत केला. १८ एकर जमीनीपैकी ६.३१ आर. जमिन माझ्या हिश्याची असून माझा पुतण्या मला वाहू देत नाही.मी खोब्रागडे यांची जमीन ठेक्याने करतो असे म्हणतो. मारायला धावतो. २०१६ मध्ये त्याने मारहाण केली होती व उलट माझ्यावरच केस लावली.असाही आरोप महादेव वरारकर यांनी यावेळी केला. तसेच सदर शेतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागेपर्यंत कोणीही अडथळा आणू नये व मला शेती करु द्यावे असेही वरारकर पत्रपरिषदेत म्हणाले. दि.२८ ऑक्टोबर रोजी नायब तहसीलदार भांदककर व तलाठी गहुकर आणि दोन पोलिस शेतात आले व परत निघून गेले. त्यांनी काहीच केले नाही. असेही वरारकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. दरम्यान, याबाबत भास्कर वरारकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने