Top News

प्रेरणा महाविद्यालयाने अधिकारी निर्माण करावेत:- प्राचार्य डॉ. संभाजी वारकड. #Korpana


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
कोरपना:- स्पर्धेचे युग असल्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करणे गरजेचे आहे. विविध विभागातील कोणत्याही नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची जय्यत तयारी विद्यार्थ्यांनी करावी.इच्छाशक्ती, कठोर मेहनत, नियोजन आणि सातत्य या बळावर आपल्या जीवनात यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड सर यांनी केले.
ते युगचेतना ग्रामविकास बहूद्देशीय संस्थेद्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना प्राचार्य एस.एम. वाडकर यांनी अनेक बाबीने आपलं जीवन अभावग्रस्त आहे आणि काहीही नसणारेच यशस्वी होण्याचा हा काळ आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी धडपड करा.मा. अब्दुल कलाम साहेब, श्री. भोसले, प्रशांत खडककर, दिपाली मासिरकर, छोरिंग दोरजे  यांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून देऊन स्पर्धा परीक्षेसाठी संपूर्ण ताकदीनिशी अभ्यास करण्याची सवय निर्माण करून जीवनात यशस्वी होण्याचा सल्ला दिला. 
   
    तद्वतच नियोजनबद्ध आखणीतून प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयाने अतिदुर्गम, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील आदिवासी व  गैरआदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयाने अधिकारी निर्माण करावेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री नामदेवराव ठेंगणे सर होते.
    
     महाविद्यालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता तथा उद्योजक बालाजीभाऊ  पांडुरंग पुरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष मा. शरदभाऊ जोगी, रमेश राठोड, श्री.पाल,  बालाजी मोरे, अरविंद मुसणे, प्रा.दिनेश गुरनुले, प्रा. राहुल ठोंबरे, प्रा.आकाश पाझारे, प्रा.देरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
     
    यावेळी मान्यवरांचा संस्थेच्यावतीने  सत्कार करण्यात आला. श्री. बालाजी पुरी, शरदभाऊ जोगी, रमेश राठोड, बालाजी मोरे यांनी प्रेरणा काॕलेज हे आज छोटेसे रोपटे  जरी असले तरी मात्र उद्या भविष्यामध्ये याचा वेल गगनापर्यंत पोहोचत अनेकानेक विद्यार्थी अधिकारी बनून येथून बाहेर पडावेत आणि आपले आयुष्य उज्वल बनवत सत्कार्य घडावे. असे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
     
       अध्यक्षीय भाषणातून मा. नामदेवराव ठेंगणे यांनी  आत्मबल हे यशाचे गमक असून सातत्यपूर्ण अभ्यास व सरावाने यश मिळवत पालकांचे स्वप्न  नक्कीच पूर्ण करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी धेय्यपूर्तीसाठी प्रयत्नरत असावे असा सल्ला दिला.
बहारदार कार्यक्रमात शाहीर संभाजी ढगे यांनी स्वरचित स्वागतगीताचे गायन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.राहूल ठोंबरे यांनी  तर उपस्थिताचे आभार प्रा.आकाश पाझारे यांनी मानले. चेतन पवार, प्रफुल्ल मांडोकार, अजय ताजणे, सुरज बावणे, निकिता, आम्रपाली, सुरज, आकाश, वैभव,जंगू आदीनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने