जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जागेच्या वादातून उपसरपंचाचा खून #murder

हत्या प्रकरणातील सहा आरोपींना अटक
भंडारा:- जागेच्या किरकोळ वादात डोक्यावर काठीचा वार करुन उपसरपंचाचा खून करण्याची घटना भंडारालगतच्या दवडीपार येथे शुक्रवारच्या रात्री घडली होती.
व आरोपी घटनास्तावरून पसार झाले असताना पोलिसांनी दवडीपारच्या माजी पोलीस पाटलासह त्यांच्या पाच मुलांना ताब्यात घेतले. दिनेश बांते वय 39 रा. दवडीपार असे मृत उपसरपंचाचे नाव आहे . विशेष म्हणजे मृतक दिनेश बांते हा उपसरपंच असून शिवसेनेच्या विभाग प्रमुख सुद्धा आहे.
बांते व मते यांच्यात घराच्या जागेचा वाद गत काही वर्षापासून सुरु होता. शुक्रवारी रात्री यावरुन पुन्हा वाद झाला. या वादात दिनेश बांतेच्या डोक्यावर काठीने प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना भंडाराच्या शासकीय रूग्णालयात आणले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. ह्या प्रलरणी सहाही आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत