जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार यांच्याकडून कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत. #Shindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील रत्नापुर येथील रहिवासी महमंद वजीर शेख यांची अनेक दिवसांपासून आजारी असल्याने व आर्थिक परिस्थिति चांगली नसल्या कारणाने पुढील उपचार थांबला होता. हि माहिती तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे जि. प. सदयस चंद्रपुर यांना माहिती पडल्याने त्यांनी पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार यांना फोन करुण त्यांची आर्थिक परिस्थिति बेताची असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी एक छोटीसी आर्थिक मदत द्यावी.
या हेतुने एक मदतिचा पाहुल म्हणून लगेच चंद्रपुरचे पालकमंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी तालुका कांग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, तसेच तालुका कांग्रेस कमिटी उपाअध्यक्ष संजय गहाने यांच्याजवळ आर्थिक मदत देऊन पुढील उपचारा साठी संपूर्ण मदत केली जाईल असे सांगितले. महमंद वजीर शेख रत्नापुर हे गरीब कुटुंबातील व्यक्ति असून तेच प्रमुख आहेत. त्यांना मुल-बाळ नसून निराधार आहेत. म्हणून त्यांना मिळालेली ही एक मदत मोलाची ठरेल.

मदत करतेवेळी संजय गहाने, माजी उपसरपंच उध्दव राव तोनफोडे, मंगेश मेश्राम ग्राम पंचायत सदय, इमरान पठान, वासुदेव दडमल, कपिल मेश्राम, वामन जीवतोडे, दादाजी काळसरपे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत