Top News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अनिरुद्ध डाखरे यांचा कुटुंबासह सत्कार. #Rajura



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- श्री.डाखरे सर यांचे चिरंजीव कुमार अनिरुद्ध डाखरे हे NEET परीक्षेत 720 पैकी 710 गुण घेऊन देशात 38 वा क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा तर्फे अनिरुद्ध डाखरे व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डाखरे सरांचे तीन्हही मुले एम.बी.बी.एस. झाले असून त्यांनी तालुक्याचे नाही तर जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे. त्यांच्या पुढील वाटलचालीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संतोष देरकर यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कार समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, शहर अध्यक्ष रखीब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष असिफ सय्यद, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजूजवार आदी उपस्थित होते.#Rajura

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने