Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

बारच्या वेटरची तिसर्‍या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या. #suicide.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
वणी (जि. यवतमाळ):- शहरातील बियर बारमध्ये काम करणार्‍या एका 40 वर्षीय वेटरने बारच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी घेतली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वेटरचा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना आज शनिवारी (ता. 6) मृत्यू झाला.
बालाजी मेश्राम (वय 40, रा. कोरपना ता. वणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वणी शहरातील श्याम टॉकीज परिसरात असलेल्या एका बियर बारमध्ये गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम करीत होता. काम झाल्यावर तो त्याच बियर बारमध्ये राहत होता. मात्र, शुक्रवारी (ता. 5) रात्री त्याने बियरबारच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली.
पहाटे तो बियर बारसमोर पडून असल्याचे लक्षात आल्यावर त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बालाजी याने आत्महत्या का केली, याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकली नाही. याबाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत