जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दारुड्या बापाने मुलाला काठी तुटेपर्यंत मारलं #socialmedia #viralvideo

गंभीर अवस्थेत मुलगा रुग्णालयात दाखल

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल
हैद्राबाद:- हैद्राबादमध्ये एका वडिलांनी दारूच्या नशेत आपल्या मुलाला काठीने जबर मारहाण केली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
IAS अधिकारी Awanish Sharen यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि मारहाण करणाऱ्या बापाला कडक शिक्षा मिळायला हवी. हैद्राबादमधील ट्रूप बाजारातील एका दुकानात सेल्समॅन म्हणून काम करणारा 38 वर्षीय अशोक घांटेने छोट्याशा गोष्टीवरुन आपल्या मुलाला काडीने जबर मारहाण केली. पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सांगितलं जात आहे की, अशोकच्या पत्नीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पती तिचा व मुलासह प्राण्यांसारखी वागणूक देतो. पत्नी आणि मुलगी अशोकसमोर माफी मागत होती आणि मुलाला सोडण्याची विनंती करीत होते. मात्र बापाने एकही शब्द ऐकला नाही.
पोलीस इन्स्पेक्टर अब्दुल खादेर जिलाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी अशोकने खूप दारू प्यायली होती. मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. नियमितपणे हा निदर्यी बाप मुलाला मारहाण करीत असल्याचं सांगितलं जात आहे. #साभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत