चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विदर्भ प्रांताचे 50 वे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन यंदा चंद्रपुरात होऊ घातले असून, येत्या 7, 8 व 9 डिसेंबर 2022 रोजी स्व. दत्ताजी डिढोळकर नगर, शकुंतला फॉर्म, नागपुर रोड, चंद्रपुर येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी समाजातून निधी उभारला जात आहे. अभाविपचे कार्यकर्ते लघु निधी गोळा करीत असून, त्यांना नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन या अधिवेशनाच्या आयोजन समितीने केले आहे.
ज्ञान, शील, एकता या मंत्रातून गेली 74 वर्ष अविरतपणे काम करणारी आणि दरवर्षी 30 लाख सदस्यता करणारी अभाविप ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. अभाविपच्या विदर्भ प्रांताचे यंदा अत्यंत महत्वाचे असे 50 वे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन चंद्रपुरात होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क व्हावा आणि त्यातून काही निधीही उभारता यावा, या उद्देशाने अभाविपचे कार्यकर्ते समाजात जात आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. या निधी समर्पणासाठी प्रवीण गिलबिले (9168369593), शकिल शेख (7773956054), अमोल मदने (9309171203) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अभाविपने केले आहे.