Click Here...👇👇👇

पाटण भागात बोगस डॅाक्टरांचे बस्तान #bogusdoctor

Bhairav Diwase
ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॅाक्टरांची मलमपट्टी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील पाटण भागात अनेक बोगस डॅाक्टरांचा सुळसुळाट वाढला असुन याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दुर्गम व मागास अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील पाटण भागात पाच ते सात बोगस डॅाक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही परवानगी अथवा पदवी नसतांना थातुरमातुर केलेल्या वैद्यकीय सेवेच्या भरोश्यावर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॅाक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे लोक आजारी पडल्यामुळे खाजगी दवाखाने गच्च भरलेली दिसताहेत. ग्रामीण जनतेचे आरोग्य निट राहावे त्यांना आरोग्याची योग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य सेवेची निर्मिती केली आहे, परंतु अपुऱ्या सोई सुविधा व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे ग्रामीण जनतेला जिल्हयाच्या ठिकाणी किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत असल्याचे दिसुन येत आहे. परिणामी संधी पाहुन बोगस डॅाक्टरांनी आपले बस्तान मांडले आहे. आजघडीला अनेक बोगस डॅाक्टर ग्रामीण भागात फिरतांना दिसतात. या स्वयंघोषित बोगस डॅाक्टरांनी जनतेला लुबाडून लाखो रुपयांची माया गोळा केल्याची चर्चा आहे.
नियमानुसार डॅाक्टरांना दवाखान्यात औषधी ठेवता येत नाही मात्र हे बोगस डॅाक्टर फार्मसीतुन भरमसाठ औषधी खरेदी करून घरात व दवाखान्यात साठवणुक करुण ठेवतात व रात्री एखादा रुग्ण आला की त्यावर महागडा उपचार करुन त्याची लुबाडणूक केली जाते. अनेकवेळा यांच्या हातुन रुग्ण दगावले आहेत मात्र आपसी तडजोडीने प्रकरण दडपण्यात आल्याचे बोलले जात आहे, पाटण भागात बोगस डॅाक्टरांची सेवा सुरू असुन अशा गंभीर बाबीकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष दिसुन येत आहे.