💻

💻

संजय गजपुरे.... पक्षनिष्ठेचे उत्तम उदाहरण! #Birthday


अतिशय सामान्य राहणी... सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सतत धडपड करणारा नेता.... लोकमान्यतेचे पाठबळ... तरीही पाय मात्र जमिनीवर.... पक्षनिष्ठा हे त्याचे बलस्थान.... पक्षासाठी जीवाचे रान करण्याची वृत्ती.... क्रियाशील, कार्यक्षम, कर्तव्यतत्पर लोकप्रतिनिधी.... अशी अनेक विशेषणे थिटी पडावी असे नाव म्हणजे संजय गजपुरे
भारतीय जनता पार्टीचे चंद्रपुर जिल्हा संघटन सरचिटणीस आणि चंद्रपुर जिल्हा परिषद सदस्य श्री संजय गजपुरे म्हणजे सदैव कार्यमग्न राहणारे व्यक्तिमत्व. नागभीड तालुक्यातील पारडी-मिंडाळा-बाळापुर जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी सतत धडपड करणारे संजय गजपुरे आबालवृद्धां सोबतच तरुणांमध्येही तितकेच लोकप्रिय . जिल्हा परिषद क्षेत्राच्या समस्यांचे एकमेव उत्तर म्हणजे संजय गजपुरे.
मधल्या काळात जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले होते. पण ऐनवेळी पक्ष स्तरावर निर्णय बदलला मात्र हा सच्चा स्वयंसेवक हसतमुखाने पक्षाच्या निर्णयाचा सन्मान करता झाला. त्यांच्या त्या कृतीला त्या क्षणी सलाम करावासा वाटला. पक्ष संघटने वर त्यांची लक्षणीय पकड़. गटातटाच्या राजकारणाला त्यांच्या लेखी अजिबात थारा नाही. असा हा आदर्श कार्यकर्ता भाजपची जमेची बाजू आहे.
आज २८ डिसेंबर , संजय गजपुरे यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांचे हार्दिक अभिष्टचिन्तन !!!*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत