💻

💻

विकासपुरुषांची विकासगाथा #Chandrapur #sudhirmungantiwar

महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेले निर्णय व विकासकामे याची समग्र महिती देणाऱ्या डिजिटल बुक अर्थात "विकासगाथा" चे उदघाटन संपन्न. 

खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन डिजिटल बुक अर्थात "विकासगाथा" डाऊनलोड करा
👇👇👇👇👇👇

श्री. देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी आज माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामांवर आधारित " विकासगाथा" डिजिटल बुक चे उदघाटन केले, सुधीरभाऊंनी महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेत महाराष्ट्रभर विकासकामे केली,तसेच समाजहितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले या घेतलेल्या काही निर्णयाची व विकासकामांची माहिती विकासगाथा या डिजिटल बुकद्वारे सर्वांना व्हिडियोच्या माध्यमातून एका क्लीकवर थेट पाहायला मिळणार आहे .
या डिजिटल बुकमध्ये सुधीरभाऊंनी केलेले राष्ट्रपित्याला अनोखे अभिवादन,बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र,पंढरपूर येथील तुळशी वृंदावन उद्यान, सावित्रीबाई पुणे विद्यापीठ नामकरण, मिशन शक्ती आणि मिशन शोर्य,शुद्ध पाणी लख्ख प्रकाश,वृक्ष लागवड,रोजगार निर्मिती,तीर्थक्षेत्र विकास पर्यटनाची नांदीच,नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचे नाव,इको पार्क रेल्वे स्टेशन पुतळे नव्हे प्रेरणा,भारतातील एकमेवाद्वितीय वन अकादमी,डाक तिकीट,वाघांचे माहेरघर ताडोबा,जलसंजीवन,अजयपूर आणि गायमुख पर्यटन विकास,डॉ . श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालये,सैनिकी शाळा ,निराधारांना दिला आधार,उजळल्या दाही दिशा,आरोग्य यंत्रणेला बळकटी ,स्मार्ट अंगणवाडी ,ग्रामीण विकासाला चालना आणि चंद्रपूर महानगराचा सर्वांगीण विकासकामे या डिजिटल बुकच्या माध्यमातून थेट बघायला मिळेल.
लोकनेते, विकासपुरुष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कधी प्रादेशिक भेदभाव न करता अवघ्या महाराष्ट्रात समतोल निधी उपलब्ध करून दिला, महाराष्ट्राच्या वनक्षेत्र संवर्धनासाठी दिवस-रात्र एक केला आणि त्यांनी महाराष्ट्राचे पर्यटन पर्यावरण संतुलन कायम राहावे म्हणून देशातील सर्वात मोठी वृक्षारोपण मोहीम राबवण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले, या विक्रमी मोहिमेची लिंमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात भाऊंनी विकासासाठी निधी दिला सोबतच फक्त मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी केलेल्या कामामुळे हे शहर विकासाच्या वाटेवर अधिक "स्मार्ट" बनले आहे , खनिज संपदा, पौराणिक इतिहास, वीज निर्मितीचे देशातील महत्त्वाचे केंद्र, आंतरराष्ट्रीयस्तरावरील पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे अभयारण्याचे ठिकाणी अशी बहुआयामी ओळख असलेल्या चंद्रपूरच्या विकासात आ. सुधीरभाऊंचा मोठा वाटा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत