💻

💻

पतीने कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीला केलं रक्तबंबाळ #murder

पत्नीचा जागीच तडफडून मृत्यू; आरोपी पती घटनास्थळावरून पसार
यवतमाळ:- यवतमाळ शहरातील विटाळा वार्ड परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे.
हा हल्ला इतका भयावह होता की, पत्नीचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. रेखा नारायण खराबे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे.
तर नारायण यादवराव खराबे असं गुन्हा दाखल झालेल्या 40 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी नारायण याचं आपल्या पत्नीसोबत नेहमी कोणत्या ना कोणत्या किरकोळ कारणातून वाद होत होता. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास देखील आरोपीचं किरकोळ कारणातून आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. काही वेळातच या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.
यावेळी संतापलेल्या नारायण याने धारदार कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यात वार केले. हा हल्ला इतका भयावह होता की पत्नी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. यातच तिचा मृत्यू झाला आहे. पत्नीचा मृत्यू होताच पती नारायण याने घटनास्थळावरून पोबारा केला.
यावेळी जखमी अवस्थेतील रेखा यांना आसपासच्या लोकांनी तातडीने मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी गेलं असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रेखा यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत