Top News

पोंभुर्णा नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्‍यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करा #Pombhurna #bjp

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना आ. मुनगंटीवार यांचे आवाहन
पोंभुर्णा:- पोंभुर्णा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्‍ये रुपांतर केले. नागरिकांच्‍या आशिर्वादाच्‍या बळावर या नगर पंचायतीवर प्रथमतः भाजपाची सत्‍ता आली. पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात अभुतपुर्व अशी विकासाची कामे आपण पुर्णत्‍वास आणली. पुन्‍हा एकदा पोंभुर्णा शहराच्‍या विकासाला वेग आणण्‍यासाठी या नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्‍यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करा असे आवाहन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि. १६.१२.२०२१ रोजी पोंभुर्णा येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना संबोधित केले. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपा महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा अल्‍का आत्राम, निवडणुक प्रभारी अजय दुबे, आशिष देवतळे, ईश्‍वर नैताम, नंदकिशोर तुम्‍मुलवार, रुषी कोटरंगे, ज्‍योती बुरांडे, वैशाली बोल्‍लमवार, सुनिता मॅकलवार, राम लाखीयॉ, पिपल्‍स रिपब्‍लीकन पार्टीचे तेजराज मानकर, जिवन वनकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, राज्‍यात भारतीय जनता पार्टीचे सरकार कार्यरत असताना पोंभुर्णा नगर पंचायतीची निर्मिती आम्‍ही केली. तेव्‍हापासून या शहरात विकासाची दीर्घ मालिका आम्‍ही तयार केली. या शहराचा चेहरामोहरा आम्‍ही बदलविला. अमे‍रीकेच्‍या व्‍हाईट हाऊसची प्रतिकृती असलेली पोंभुर्णा नगर पंचायतीची आकर्षक इमारत, पोंभुर्णा शहरात पंचायत समिती व तहसिल कार्यालयाच्‍या इमारतीचे बांधकाम, ग्रामीण रुग्‍णालयाची निर्मिती, टूथपिक केंद्र, बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, आदिवासी मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृहाच्‍या बांधकामाला मंजूरी, वनविश्रामगृहाचे बांधकाम, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, पाणी स्‍वच्‍छता पार्कचे बांधकाम, महिलांसाठी अगरबत्‍ती उत्‍पादन केंद्र, अत्‍याधुनिक स्‍टेडियमचे बांधकाम, एलईडी पथदिवे, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम, श्री. राजराजेश्‍वर मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण, मुख्‍य रस्‍त्‍याचे सिमेंटीकरण व दुभाषक व पथदिवे बसविणे, बस स्‍थानकाच्‍या बांधकामाला मंजुरी, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाची निर्मीती, औद्योगीक प्रशिक्षण संस्‍थेचे नुतनीकरण, पाणी पुरवठा योजना, तलाव सौंदर्यीकरण, संताजी जगनाडे महाराज सभागृहाच्‍या बांधकामला मंजुरी, वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहाच्‍या बांधकामाला मंजुरी, खुल्‍या नाटयगृहाच्‍या बांधकामाला मंजुरी, आरो प्‍लॅन्‍ट, अंगणवाडी व शाळा नुतनीकरण, ई-लर्निंगची सोय अशी विकासाची विविध कामे आम्‍ही पोंभुर्णा शहरात पूर्ण करविली. रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपक्रम आम्‍ही राबविले. आदिवासी भगिनींची राज्‍यातील पहिली कुक्‍कूटपालन संस्‍था पोंभुर्णा येथे अस्तित्‍वात आली. मधुमक्षिका पालनाचा यशस्‍वी प्रयोग आम्‍ही राबविला. या परिसरात स्‍वंतत्र एमआयडीसी स्‍थापन करण्‍याची आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत असेही ते म्‍हणाले.
विकासाचा समानार्थी शब्‍द म्‍हणजे भारतीय जनता पार्टी आहे. या शहराच्‍या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचा झेंडा पुन्‍हा एकदा पोंभुर्णा नगर पंचायतीवर फडकविण्‍यासाठी योग्‍य नियोजन करुन, प्रत्‍येक मतदाराशी संपर्क साधून विजय संपादन करण्‍याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले.
यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍याचे मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने