💻

💻

तंटा मुक्त समिती लाडबोरीच्या वतीने प्रेमी युगलाचा विवाह सोहळा संपन्न #Sindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- लाडबोरी मधील प्रेमी युगुल मुलगा आशिष बालाजी घरत व आचल सुनिल नन्नावरे मु पो. लाडबोरी येथील रहवासी असून यांचे एकमेकावर प्रेम होते.

सदर प्रेम प्रकरण बाबत दोन्ही मुला मुलींच्या घरी माहिती झाले व मुला मुलींना एकमेकाशी लग्न करायचं असल्याने दोन्ही घराच्या लोकांच्या आपसी संमतीने रीतसर तंटा मुक्ती गाव समिती लाडबोरी कडे विवाह करण्यासाठी अर्ज सादर केला. सदर अर्जावर विचार करून मुला मुलींच्या संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करून विवाह सोहळ्यास परवानगी देऊन मुला मुलीचे विवाह तंटा मुक्त गाव समिती लाडबोरी याच्या सदस्यगन व गावकरी मंडळी यांच्या उपस्थित पार पडला.
🌅
या मध्ये तंटा मुक्त समिती अध्यक्ष अंबादास चौके, सरपंच ममता चहांदे, वाल्मीक जुमनाके, भैयाजी मानकर, नरहरी डांगे, भीमराव नागदेवते, रामचंद्र ननावरे, मुरलीधर उईके, भारती चहांदे, सुजाता तामगाडगे, गणपत वनस्कर,व सुनिल गेडाम यांच्या उपस्थित पार पडला.संबधित तंटा मुक्त गाव समिती च्या वतीने संबधित प्रेमी युगुलाला विवाह प्रमाणपत्र देण्यात आले.
🌄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत