जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांनी वनविभागाला दिले निवेदन
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी तुकुम बेघर वस्तीमध्ये मागील ३-४ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. ३-४ दिवसात बिबट्याने गावामध्ये रात्रीच्या वेळेस प्रवेश करून गावातील 10 कोंबड्या, 2 पाळीव कुत्रे आतापर्यंत ठार केले आहे. बिबट्याने गावामध्ये प्रवेश केल्याने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने गावामध्ये गस्त घालून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार तसेच वनविभागाला निवेदन दिले. यावेळी लक्ष्मण गव्हारे, चंद्रशेखर झगडकर उपस्थित होते.