तुलानमेंढा येथे आढळला 9.2 फुटाचा अजगर #Dragon

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील तुलानमेंढा या गावात संकेत सुरेश कावळे यांच्या गोदामात अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
सदर घटनेची माहिती ब्रम्हपुरी येथील सर्पमित्र ललित उरकुडे, वृषभ राऊत यांनी देण्यात आली. अथक प्रयत्नानंतर विशाल अजगरला पकडून मेंडकी वन परिक्षेत्राचे RO शेंदूरकर व वनरक्षक टेकाम यांच्या निगराणीत सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आले.
सदर अजगर हा 9.2ft असून त्याचे वजन 14kg होते. बचाव कार्यात प्राश खोब्रागडे आणि गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.