Top News

मंदिरात गुप्तधन शोधणारी टोळी जेरबंद #arrested


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न करणार आठ जणांच्या टोळीतील सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोन जण फरार झाले. पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, या प्रकरणाचे धागे-दोरे शोधून काढण्यासाठी चौकशीला सुरुवात केली आहे. येथील काही शेतकऱ्यांनी रात्री मंदिरात पाळत ठेवून या टोळीला गजाआड करण्‍यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस सूत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात नागरी येथे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर प्राचीन कोंडेसरी मंदिर आहे. मंदिर परिसरात मागील तीन महिन्यांपासून काहींच्‍या संशयित हालचाली असलेल्या नागरिकांचे या परिसरात येणे जाणे सुरू आहे. गुप्तधन शोधण्याच्या उद्देशाने मंदिराच्या आतील आणि बाहेर परिसराची त्यांच्याकडून पाहणी होत असल्याचे काही शेतकऱ्यांना आढळून आले होते.
आठ दिवसापूर्वी ही या ठिकाणी गुप्तधनासाठी खोदकाम करण्याचा प्रयत्न झाला होता. गुरुवार, शनिवार, पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दिवशी गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळाली होती. शेतकऱ्यांनी या टोळीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. 6 जानेवारीला 2022 ला या ठिकाणी स्थानिक काही नागरिकांच्या सहकाऱ्याने यवतमाळ जिल्ह्यातील गुप्तधन शोधणारी टोळी येणार असल्याची खात्री झाली होती.
शेतकरी घोलर हे चार सहकाऱ्यांना घेऊन रात्रीच्या सुमारास पाळत ठेवली. आठ वाजताच्या सुमारास मारुती कारने मांत्रिकासह आठ जणांचा ताफा मंदिर परिसरात येऊन धडकला. मंदिराच्या आतील आणि बाहेरील भागाची पाहणी केल्यानंतर आतील परिसरात सर्वप्रथम पूजा पाठाचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. खड्डा खोदकाम सुरू असतानाच बंडू विठ्ठल घोलर यांनी, सहकार्‍यांसह त्यांना अटकाव केला. मात्र टोळीतील व्यक्ती जास्त असल्याने त्यांनी उलट यांना मारहाण केली. मात्र समयसूचकतेणे या चारही व्यक्तींनी गावातील अन्य नागरिकांना कोंढेसरी मंदिरात गुप्तधन काढणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडण्यासाठी सतर्क केले होते. अर्धा तासाच्या कालावधीनंतर नागरी गावातील नागरिकांचा ताफा त्याठिकाणी धडकला आणि टोळीतील आठ पैकी सहा जणांना साहित्यासह पकडले. दोन जण पसार झाले.
पाेलीस उपनिरीक्षक किटे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक रात्री घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत त्या टोळीला पकडून नागरी गावाच्या दिशेने पकडून आणत असताना पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये या घटनेचा मुख्य सूत्रधार संदीप रामटेके (वय ३५, रा. पाटेपुरा वार्ड (यवतमाळ), देवराव गजभिये (वय ५०, अंबिकानगर (यवतमाळ), भारत पिसे (वय 55, रा. वाघनख (चंद्रपूर), सुरेश सावंतकर (वय 36, ताळीनगर (यवतमाळ), इरफान रहीम शेख ( वय 25, रा. यवतमाळ ), पिंटू पिसे (वय 32, रा. नागरी चंद्रपूर) अशी अटक केल्‍यांची नावे आहेत. संशयित आरोपींकडून कारसह खोदकाम करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आलेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या ठिकाणी गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.पाेलीस उपनिरीक्षक किटे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक रात्री घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत त्या टोळीला पकडून नागरी गावाच्या दिशेने पकडून आणत असताना पोलिसांनी सहाही जणांना ताब्यात घेऊन अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये या घटनेचा मुख्य सूत्रधार संदीप रामटेके (वय ३५, रा. पाटेपुरा वार्ड (यवतमाळ), देवराव गजभिये (वय ५०, अंबिकानगर (यवतमाळ), भारत पिसे (वय 55, रा. वाघनख (चंद्रपूर), सुरेश सावंतकर (वय 36, ताळीनगर (यवतमाळ), इरफान रहीम शेख ( वय 25, रा. यवतमाळ ), पिंटू पिसे (वय 32, रा. नागरी चंद्रपूर) अशी अटक केल्‍यांची नावे आहेत. संशयित आरोपींकडून कारसह खोदकाम करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आलेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या ठिकाणी गुप्तधन शोधण्‍याचा प्रयत्न केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने