जाहिरात... Advertisement... विज्ञापन

एक असा ही बाप.....

मुलीच्या जन्माच्या आनंदात बापाने मरणोत्तर केला नेत्रदानाचा संकल्प

एका सुशिक्षित प्रहारच्या इंजिनियर ने घेतला समाजाला दिशा देणारा निर्णय

कोरपना:- सिल्वर सिटी म्हणून देशात ओळख असलेल्या गडचांदूर शहरातील एका इंजिनियर ने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. आजच्या घडीला मुलगी जन्मला आली की  तिच्या वर होणारे अन्याय, स्त्रीभ्रूण हत्या मुलगी म्हटलं की ती नकोशी, असे अनेक उदाहरण आपल्या समोर येतात यालाच एक अपवाद म्हणून एका प्रहार संघटनेच्या सुशक्षित इंजिनियर ने मुलीच्या  जन्मावर  आनंद साजरा करतांना एक आगळावेगळा निर्णय घेतला त्यामुळे इंजिनियरवर समजा कडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे ही गोष्ट आहे.

 गडचांदूर शहरातील व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या इंजि. अरविंद वाघमारे यांची  त्यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले याचाच आनंद म्हणून त्यांनी मुलीच्या जन्मावर मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला यामुळे अनेक समाज वर्गा कडून त्यांचे अभिनंदन व  शुभेच्छा चा वर्षाव होत आहे  इंजि यांनी सांगितले की मरणानंतर डोळ्यांची राख होण्यापेक्षा मरणोत्तर नेत्र दान केल्यास आपण दोन लोकांना दृष्टी देऊ शकतो व ज्यांनी हे जग पाहले नाही ते आपल्या डोळ्यांनी नवे जग पाहू शकतात असे मत त्यांचे मित्र प्रहार चे सतीश बिडकर यांनी इंजि वाघमारे यांच्या जवळ बोलून दाखवले त्यामुळेच आपल्या मरणानंतर आपली दृष्टी ही दुसऱ्या ला देऊन जाणे या शिवाय मोठे कार्य या जगात कोणतेच नाही. मुलीचा जन्म हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे आणि तो मला माझ्या आनंदात दुसऱ्याला सुद्धा आनंदात ठेवायचा एक छोटासा प्रयत्न आहे. 

मी भाग्यवान आहे की, स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती ना घडवणाऱ्या माँसाहेब माझ्या घरात मुलीच्या रूपात आल्या. आणि नेत्रदानाबद्दल बोलायचं झालं तर माझे मित्र प्रहार सेवक सतिश बिडकर यांनी नेत्रदानाबद्दल जनजागृती करण्यात सुरुवात केली त्याच हेतूला मला सुद्धा  समाजाला काही देने आहे  व देशाच्या संविधानानेच घडवलं आहे, आणि मी ह्या समाजाचा व संविधानाचा ऋणी आहे. मी हे ऋण मला जसं जमलं त्या प्रकारे फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. व समाजाने सुद्धा मरणोत्तर नेत्रदान करायला पाहिजे व मी सुद्धा नेत्रदाना बद्दल जनजागृती करणार व समाजच्या नागरिकांनी सुद्धा समोर यायला पाहिजे.
इंजि अरविंद वाघमारे

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत