जाहिरात... Advertisement... विज्ञापन

युवकांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श जपावा:- विशाल निंबाळकर #chandrapur

भारतीय जनता युवा मोर्चा महानगर तर्फे विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
चंद्रपूर:- 12 जानेवारी ला स्वामी विवेकानंद जयंती निमित्य संपूर्ण देशात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो त्यामागचा उद्देश युवा पिढीने स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करावे हा आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा महानगर चंद्रपूर च्या वतीने महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या गिरनार चौक येथील जनसंपर्क कार्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी सांगितले की स्वामी विवेकानंद यांचे विचार युवा पिढीने आत्मसात करून त्यांनी सांगितलेला आदर्श युवा पिढीने जपावा व त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करून जिवनात यश गाठावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रेरणा देणारे असून प्रत्येक युवकांनी ते आचरणात आणले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमात कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर,महानगर उपाध्यक्षा भारती दुधानी,महानगर सचिव राजेंद्र खांडेकर,रामकुमार अक्कापेल्लीवार, भारतीय जनता युवा मोर्चा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू,सुनील डोंगरे, उपाध्यक्ष यश बांगडे,कुणाल गुंडावार,राहुल पाल,स्नेहित लांजेवार,राजेश यादव,आकाश मस्के,पवन ढवळे,रामनारायण रविदास, सचिव सतीश तायडे,प्रवीण उरकुडे,प्रणय डंबारे,धनंजय मुक्फलवार,सत्यम गाणार,मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार,हिमांशू गादेवार,जयश्री आत्राम,विक्की मेश्राम,महेश कोलावार,बंडू गौरकार, देवा बुरडकर,अखिलेश रोहिदास,सचिन यामावार,प्रतीक अंगरवार,विवेक शेंडे,रुपाली मल्लेलवार तथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवकांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यामध्ये वैभव मेहता,डॉ.अमित डांगेवार,हिमांशु पन्नासे,सौरभ मेश्राम,प्रतीक बनकर, अंकिता देशेट्टीवार यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत