जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भरदिवसा घरात रंगला खुनी खेळ #murder

चाकूने घाव घालत पत्नीला व मुलीला केलं रक्तबंबाळ
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे एक थरारक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने धारदार चाकूने घाव घालून आपल्या पत्नीला व मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. या हल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. यात मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर चंद्रपुरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला कशावरून झाले हे सद्या बातमी लिहीत पर्यंत कळू शकले नाही.
सदर घटना वेकोलि ए-टाइप वसाहत कुचना कॉलोनी येथील ब्लॉक नंबर-१० क्वार्टर नंबर-७७ मध्ये घडली असून आरोपी वीरेंद्र रामप्यारे साहनी वय (४३) हा वेकोलि माजरीच्या खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असून आज (१३ जानेवारी) दुपारी दोन वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलीवर धारदार चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करून पळून गेला. या हल्ल्यात पत्नी सुमन वीरेंद्र साहनी (३६) हिला पोटात व छातीत मारले त्यामुळे तिचे वेकोलि माजरीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाले असून मुलगी सिमरन वीरेंद्र साहनी (१७) हिला पोटात चाकू खुपसले यात ती गंभीर जख्मी झाली असून तिचे उपचार चंद्रपुरच्या खाजगी रुग्णालय कुबेर हॉस्पिटल येथे सुरु आहे.आरोपी वीरेंद्र साहनी हे आपल्या घरात खूनी खेळ खेळून वसाहतीची भींत ओलांडून विसलोन गावाच्या रेलवे मार्गाने पसार होत असताना कुचना कॉलोनीतील काही युवकानी पकड़ून माजरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी घटनास्थळी दाखल झाले.वृत्त लिहेपर्यंत पोलिसांचा तपास सुरु होता.या घटनेमुळे कुचना वसाहत परिसर हादरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत