जाहिरात... Advertisement... विज्ञापन

'पंतप्रधान मोदींच्या दिर्घायुष्यासाठी महायज्ञ' #chandrapur

भाजपा महानगर चंद्रपुर,भाजपा आध्यात्मिक मोर्चाचे आयोजन
महानगर भाजपा अंतर्गत भाजपा आध्यात्मिक मोर्चा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी शनिवार( 8 जानेवारी)ला वेदमाता गायत्री शक्तीपीठ येथे सकाळी 8 वाजता महामृत्युंजय व गायत्री यज्ञ ' करण्यात आले.या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,आध्यात्मिक मोर्चाच्या विदर्भ प्रमुख शिल्पा देशकर,आध्यात्मिक मोर्चा जिल्हाध्यक्ष (डॉ शैलेंद्र शुक्ला,ग्रामिण अध्यक्ष राजकुमार पाठक,अशोक शर्मा,दीपक चोपडा,दिनकर खोब्रागडे,गणेश गुरनुले,रामकुमार आकापेलीवार व देवा बुरडकर यांनी मंत्रोच्चार करीत,आहुती अर्पण केली.

डॉ गुलवाडे म्हणाले,देश कोरोना महामारीचा सामना करीत आहे.प्रधानमंत्री मोदींमुळेच 100 कोटीच्यावर लोकांना लस मिळाली.हे मोदी होते म्हणून शक्य झाले. पंजाबमध्ये आंदोलकांनी मोदींना टार्गेट केले.त्यामुळे त्याच्या जीवाला घोका निर्माण झाला होता.आतंकवादी संघटनांच्या हिट लिस्ट मध्ये पंतप्रधान मोदी आहेत,याची कल्पना काँग्रेस प्रणित पंजाब सरकारला होती.सुदैवाने ते या षडयंत्रातुन बचावले.हे या देशाचे सौभाग्य आहे.मुळात देशातच नाहीतर विश्वपातळीवर मोदींची आज गरज आहे.म्हणून त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी महायज्ञ करण्यात आले.अशी माहिती त्यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत