Top News

वाकल ग्राम पंचायत झाली i.s.o. नामांकन प्राप्त

सिंदेवाही:- पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येणारी ग्राम पंचायत वाकल नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. एक दिवस गावासाठी अंतर्गत महिन्यातून एक दिवस प्रत्येकाने गावासाठी दिला त्याच प्रमाणे विविध जयंत्या व पुण्यतिथी तसेच 100 टक्के वसुली, 100 टक्के शौचालय , मॉडेल अंगणवाडी , मॉडेल शाळा असे कितीतरी उपक्रम ग्राम पंचायत वाकल अंतर्गत गेल्या एक वर्षात राबविण्यात आली. व पुढे निरंतर सुरू राहणार आहे.
ह्याच अनुषंगाने संवर्ग विकास अधिकारी मा.पुरी साहेब पं.स.सिंदेवाही ह्यांच्या मार्गदर्शना खाली तसेच राहुल पंचभाई सरपंच ग्राम पंचायत वाकल तसेच मा. व्हाय.एम. बारेकर ग्रामसेवक ग्राम पंचायत वाकल ह्यांच्या प्रयनातून ग्राम पंचायत वाकल ही ग्राम पंचायत i.s.o. नामांकन प्राप्त करण्यात आली
ह्या करीता मा.दिनेश मांदाडे उपसरपंच ग्रामपंचायत वाकल, मा.राहुल चिमलवार , मा.सविता संदीप कोकोडे , मा.मंगला ज्ञानेश्वर गावतुरे, मा.नंदा भोयर, मा. नीलिमा पोपटे ह्यांच्या संकल्पनेतून व वेद असोसिएट नागपूर विनोद कोल्हे सर सिनीयर ऑडिटर ह्यांच्या माध्यमातून सदर संकल्पना पूर्ण करण्यात आली.
ह्या करिता श्री.वामन कोकोडे, जगदीश कोकोडे, ग्रा.पं.कर्मचारी , रमेश मेश्राम ग्राम रोजगार सेवक व श्रीकांत भेंडारे ह्यांनी विशेष परिश्रम घेतलेआहे.
ह्या उपक्रमा करिता ग्राम पंचायत कार्यकारिणी वाकल तर्फे सर्व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने