Top News

गडचांदूर शहर बसस्थानक विना पोरके...! #Korpana

"एक धोटे गेले, दुसरे धोटे आले" परिस्थिती जैसे थे

बसस्थानकाच्या मुद्यावर आमदारांचे सस्पेशल दुर्लक्ष
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले गडचांदूर,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर आहे. मोठी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त हजारो नागरिक दररोज याठिकाणी येतात.परंतू या नावाजलेल्या शहरात बसस्थानक नसल्याने हे शहर "बसस्थानक विना पोरके!" असल्याची भावना व्यक्त होत आहे.
बसस्थानकाच्या नावाखाली प्रवासी निवारे उभारून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली गेली. तो निवारे सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने कुचकामी ठरत आहे.नागरिकांना होणाऱ्या त्रासाने परिसीमा गाठली असून एकीकडे जिल्ह्यात हायटेक बसस्थानकांची निर्मिती झाली तर दुसरीकडे येथे लोकप्रतिनिधी निव्वळ आश्वासनांचा पाऊस पाडत आहे."एक धोटे गेले,दुसरे धोटे आले" तरीपण याविषयी काहीही सकारात्मक घडताना दिसत नाही! सर्व सुविधा युक्त असे सुसज्ज बसस्थानकाचे सूख गडचांदूरकरांना केव्हा मिळणार हा मात्र संशोधनाचा विषय ठरत असून "अश्वासनांचा सुकाळ,अंमलबजावणीचा दुष्काळ" अशी संंतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बसस्थानक अभावी येथे येणार्‍या जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत असून तीनही ऋतू मध्ये बिचाऱ्या निष्पाप लोकांवर बसच्या प्रतिक्षेत इकडे-तिकडे उभे राहण्याची नामुष्की ओढावली आहे.विशेषता: चिमुकल्या बाळांची माता, वयोवृद्ध स्त्री,पुरुष व लहानमोठे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात त्रासाला सामोरे जावे लाग आहे.जनता इतक्या बिकट परिस्थतीचा सामना करीत असताना माजींनी आश्वासने देऊन दिवस काढले,आता मात्र आजी यासंदर्भात नागरिकांना केव्हा दिलासा देणार? हे पाहणे औचित्याचे ठरणार हे मात्र विशेष.
लोकांची गर्दी पाहता येथे मोठे व सूसज्ज बसस्थानक होणे अत्यंत गरजेचे होते मात्र असे झाले नाही.केवळ प्रवासी निवारे उभारून पाठ थोपटली जात आहे.बसस्थानक नसल्याने लोकांना नाईलाजास्तव प्रसाधनगृहाच्या समोर बसून बसची वाट पहावी लागत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.जनतेला सुविधा पुरविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते मात्र याठिकाणी वेगळेच चित्र दिसत आहे. भव्य-दिव्य स्वप्न दाखवून जनतेच्या तोंडाला पाने पूसणे,हाच एककलमी कार्यक्रम आजपर्यंत सुरू आहे.सध्याची परिस्थिती पाहता "गडचांदूर शहर हे बसस्थानक विना पोरके" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने