Top News

पतंग कापण्याच्या नादात आयुष्याचा दोर धोक्यात #shock


वरोरा:- कॉईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉपर तारेने पतंग उडवणे चंद्रपूर जिल्ह्यातील बालकाला महागात पडले. पतंग उडविताना कॉपर मांजाचा उच्च दाब विजवाहक तारांना स्पर्श झाल्यावर जोरदार धक्का लागल्याने आदित्य येटे नामक 11 वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरानजीकच्या बोर्डा परिसरात ही धक्कादायक घटना उजेडात आली. महापारेषण अधिकार्‍यांना घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने कॉपर तारांचे पतंगबाजीसाठी वापरले जाणारे रीळ व अन्य साहित्य ताब्यात घेतले. कॉपर तारांचा स्पर्श झाल्याने या भागातील वीज पुरवठा काही क्षणांसाठी खंडित झाला होता.
दरम्यान जखमी अवस्थेतील आदित्य येटे याला चंद्रपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत. या घटनेनंतर पतंगबाजीत दंग असलेल्या आपल्या चिमुरडयांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने