जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर विचित्र अपघात #accident

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- एका दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली आणि कंटेनर तसेच एका खासगी बसचा विचित्र अपघात घडला. या अपघातात कारमधील तिघांना दुखापत झाली आहे. हा अपघात चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव वळणावर बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडला.
यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी सुनील गोवादिपे, निशा कोरडे, प्रियंका तोडासे हे आपल्या कारने ( महा-40-ठ-8505) खाजगी कामानिमित्त नागपूरला जात होते. या महामार्गावरील पिंपळगाव वळणावर अचानक एक दुचाकीस्वार कारच्या समोर आल्याने त्याला वाचवित प्रयत्नात कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला फेकल्या गेली.
तेवढ्यात नागपूर वरून चंद्रपूरकडे येत असलेल्या कंटेनरच्या (एमएच-31-सिक्यू-1961) समोर कार आल्याने तिला धडक बसली. यात कार पलटी झाली. यामुळे कारमधील तिघे जखमी झाले. कंटेनरच्या पाठीमागे असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सचा चालक यामुळे विचलित झाला. मात्र समयसुचकता दाखवत त्याने गाडी करकचून थांबवली. त्यामुळे ही गाडी रस्त्याच्या खाली उतरवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व जखमींना वरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. निशा कोरडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. पुढील तपास वरोडा पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत