कर्नाटकातील हिंदू युवक हर्षा यांच्या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- दिनांक 23 फेब्रुवारी 2022 बुधवार ला चंद्रपूर शहरांमध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात आले. कर्नाटकातील हिंदू युवक हर्षा यांच्या हत्येचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. याकरिता चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले.


या आंदोलनात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.