ट्रक व दुचाकींचा भीषण अपघात #accident

Bhairav Diwase
३ युवकाचा घटनास्थळीच मृत्यू
सिंदेवाही:- सिंदेवाही-मूल मार्गावर मातोश्री राईस मिल मुरमाडी जवळ ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाली असल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातात ३ युवकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दुचाकी क्र. MH 34 AZ 5350 या दुचाकी ने ३ मित्र राकेश रामदास मेश्राम वय ( १६ ) रा. सिंदेवाही, विवेक राजेंद्र नाहणे, वय( ११ ) रा. मोटेगाव ता. चिमूर, रोशन विठ्ठल मेश्राम वय ( २५ ) रा.कचेपार ता. सिंदेवाही हे तिघेही सरडेपार वरून सिंदेवाही कडे येत असताना व ट्रक क्रमांक. MH 34 AB 9781 हा मूल कडे जात असताना मातोश्री राईस मिल मुरमाडी जवळ समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी वरील तीनही युवकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
सदर घटना घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून याबाबत चा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.