Top News

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया


देशाला आत्मनिर्भरतेसाठी दिर्घकाळ प्रभावी ठरणारा अर्थसंकल्प:- हंसराज अहीर

चंद्रपूर:- प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील सरकारने सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून देशाच्या भौगोलिक स्थितीशी सुसंगत ठरणारा आहे. भारताला जागतिक स्तरावर निर्यातक देश बनविण्याच्या प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाची आत्मनिर्भरतेच्या दिशेने दिर्घकाळ वाटचाल होणार असून आर्थिक विकासाच्या बाबतीत सुध्दा देश स्वयंपूर्ण बनेल असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त करतांना हंसराज अहीर यांनी कृषी क्षेत्रा, उद्योग व स्वयंरोजगारवृध्दी तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या विकासाकरीता अर्थसंकल्पाव्दारा केलेली आर्थीक तरतुद ही देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारी असून या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला दृष्टीपथात ठेवून त्यासाठी नियोजनबध्दरित्या वित्तीय तरतूद करीत केंद्रीय अर्थमंत्रयांनी शेतकरी, महिला, युवा वर्ग, श्रमीक, कौशल्य कारागिर, कष्टकरी तसेच समाजातील प्रत्येक घटकांचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केलेला आहे. कोरोना संकटकाळातून देशाला प्रगतीच्या दिशेने नेणारा तसेच सर्वांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावणारा हा कल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचे सुध्दा म्हटले आहे.


सर्वसामान्यांची अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर:- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाकडे महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचे लक्ष होते. हा अर्थसंकल्प महागाई दुर करेल अशी आशा होती. मात्र सदर अर्थसंकल्पात महागाई नियंत्रणात आणण्याच्या दिशेने कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामूळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची अपेक्षा भंग करणारा ठरला असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
    कोरोनाच्या महामारी नंतर अनेकांनी रोजगार गमविला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, घरगुती गॅसच्या किंमतीत प्रंचड वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट डगमगले आहे. अशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांसाठी, महागाई नियंत्रणासाठी तसेच रोजगार उपलब्धीसाठी मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पात विशिष्ट एका वर्गाकडे लक्ष केंद्रीत करुन घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामूळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांची मोठी निराशा झाली आहे. 60 लक्ष रोजगार निमिर्तीची घोषणा करण्यात आली असली तरी हा रोजगार कसा उपलब्ध होणार याबाबत ठोस अशी माहिती देण्यात आलेली नाही. टॅक्स स्लॅबमध्ये बदल होतील अशी अपेक्षा होती मात्र या अर्थसंकल्पात त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अमृत महोत्सवी वर्षात सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प देशाला महागाई मुक्त, रोजगार युक्त आणि प्रगतीपथावर नेणारा ठरणार अशी आशा होती. मात्र एंकदरित पाहता हा अर्थसंकल्प महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांची अपेक्षा भंग करणारा, बेरोजगार युवकांची निराशा करणारा आणि केवळ आकड्यांचा फुगवटा दाखवत जनतेला भ्रमित करणारा ठरला आहे.



आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प:- डॉ. मंगेश गुलवाडे

चंद्रपूर:- केंद्रातील नरेंद्रभाई मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणारा असून लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचे मत भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केले त्यांनी पुढे सांगितले की कृषी, पायाभूत सुविधा, वस्त्रोद्योग आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात स्थानिक स्तरावर रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी या अर्थसंकल्पा मुळे निर्माण होतील व त्यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने