Top News

जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठीत #chandrapur #Rajura

जिल्हा सचिवपदी रंजना कोहपरे यांनी निवड
राजुरा:- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना चंद्रपूरची जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यामध्ये भुराकुंडा येथील आरोग्य सेविका रंजना कोहपरे यांची जिल्हा सचिव पदी एकमताने निवड करण्यात आली.
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटनेची सभा राज्य सरचिटणीस लता पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली यामध्ये सचिवपदी रंजना कोहपरे यांची एकमताने निवड करून जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष गीता खामनकर,सचिव रंजना कोहपरे, उपाध्यक्ष यशोदा राठोड,सहसचिव वृषाली वासनिक,कोषाध्यक्ष शिल्पा वैद्य, सरिता गेडाम मंदाकिनी चुनारकर, अर्चना पोहळे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सुनंदा आत्राम, शरयू भागवत,सुनीता घडसे,शशिकला बावणे,काजल फुलझेले,नीता शेडमाके ज्योत्स्ना खिरटकर आदिंची उपस्थित होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने