संत शिरोमणी रविदास महाराज यांचे बंधुभाव वाढविण्यासाठी मोठे योगदान:- डॉ.मंगेश गुलवाडे#chandrapur

Bhairav Diwase

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे जयंती उत्साहात साजरी
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथे भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की संत शिरोमणी रविदास महाराज यांचे बंधुभाव वाढविण्यासाठी मोठे योगदान असून समानतेचे तत्त्व रुजवून समाजाला एकत्रित करण्याचे कार्य त्यांनी केले असे यावेळी सांगितले
 सदर कार्यक्रमात भाजपाचे जेष्ठ नेते चंद्रशेखर गन्नुवार, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी क्रिडांगण कमेटी अध्यक्ष मुकेश गाडगे, महादेव दुधबळे,पुल्लावार, भाजपा नेते नंदकिशोर गन्नुवार,योग प्रशिक्षक मितेश मल्लेलवार, जेष्ठ नागरिक योग प्रशिक्षक विजय चंदावार , वर्मा,राजेश यादव,दशरथ सोनकुसरे,संत शिरोमणी रविदास महाराज कमेटी अध्यक्ष लटारी नवले,जनार्धन वाकडीकर,देऊराव नवले, शंकरराव कोल्हे, निरंजने,लांडगे,शंकर भटवलकर, कुणाल गुंडावार,डाहुले, चंद्रकला ठेंगणे, रुपाली मल्लेलवार, शेंडे,तसेच जेष्ठ नागरिक संघ, योगानृत्य व भाजपच्या सदस्यांची यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.