किरायाने राहायला आला नि पोरगी पटवला #crime

Bhairav Diwase
लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार
नागपूर:- सोनू सूर्यवंशी असे प्रियकराचे नाव आहे. सोनू छायाचित्रकार असून त्याचा स्टुडिओ आहे. काही दिवसांपूर्वी तो युवतीच्या घरी किरायाने राहायचा. यादरम्यान त्यांची ओळख झाली.
ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ती सतरा वर्षांची होती. तेव्हापासून सोनूने तिचा उपभोग घेतला. तिच्या आईवडिलांशी गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याने जवळीकता वाढविली. मोबाईल नंबरवर चँटिंग, मिटिंग झाले. तीन वर्षे संबंधित युवतीशी त्याने शारीरिक संबंध (Physical contact) ठेवले. पण, लग्न करण्यास नकार दिला.

दुसऱ्या युवतीशी लग्न जुळविण्याचा त्याचा प्रयत्न होता. अशात पीडित युवतीने जरीपटका पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे हळद लागण्यापूर्वी जरीपटका पोलिसांनी त्याला अटक केली.