(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- लगतच्या तेलंगणा राज्यातील कागजनगर व माकोडी येथील शेतकरी आपला तांदूळ रेल्वेने आणून विरुर (स्टे) येथील बाजारात विकत आहे. तर काही शेतकरी आपल्या नातेवाईकांना देत असल्याची माहिती मिळाली. मात्र, दररोज विरुर रेल्वे स्टेशनवर उतरणारा तांदूळ कोणत्या नातेवाईकांकडे जातो. विरुर (स्टे.) ही बाजारपेठ एवढी मोठी आहे की, या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात तांदूळ उतरवून विकल्या जात आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. अधिक माहिती घेतली असता तेलंगणामधील एक रुपया किलोचा तांदूळ महाराष्ट्रात तब्बल चाळीस रुपये किलोने विक्री होत असल्याची धक्कादायक वास्तव पुढे आले.
तांदूळ तस्करीचे प्रकरण धरल्यानंतर आता तस्करांनी आपला मार्ग बदलला आहे. आताही तांदूळ खरेदी सीमा वरती भागातील अनुर अंतरगाव येथे सुरू आहे. एकंदरच या घडामोडी वरून अन्न पुरवठा विभाग आणि तालुका प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह लागत आहे. रविवारला पोलीस स्टेशन विरूर येथे दोन अवैध तांदुळाचे पिकअप पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले होते. त्यानंतर पोलीस विभागाने तहसील कार्यालयाला पत्र पाठविले होते, परंतु आतापर्यंत दोन पिकअप वरती काहीस कारवाई का झाली नाही? हा प्रश्न निर्माण होत आहे. आता तांदूळ तस्करी यांनी रेल्वेच्या मार्ग बदलून शिरपूर मार्गावरील स्थित असलेले अनुर अंतरगाव येथे विरूर स्टेशन चे व्यापार करणाऱ्यांनी रोडवरती टीनाच्या मोठा शेटर बांधून सोमवारला तांदूळ विक्री करण्याचे प्रकार दिसून आले होते. यावरून तस्करांची हिम्मत वाढली असल्याचे दिसून येते आहे.