Click Here...👇👇👇

गडचांदूरच्या रॅन्चोने बनविली स्कुटर #scooter

Bhairav Diwase
1 minute read
कोरपना:- सिमेंट सिटी म्हणून ओळख असलेल्या गडचांदूर येथील एका रॅन्चोने स्वदेशी बनावटीची इलेक्ट्रिक स्कूटर साकारली आहे. त्याचे हे नवे संशोधन युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राकेश नागेश पेटकर असे त्याचे नाव आहे.
राकेश हा २०१८ च्या बॅचचा मेकॅनिकल विद्द्या शाखेतील चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. काही तरी नवे करण्याच्या जिद्दीने त्याने हे अभिनव संशोधन केले आहे. घरच्याच बजाज कंपनीच्या पेट्रोल स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये त्याने रूपांतर केले आहे. ही स्कूटर अवघ्या तीस रुपयांच्या चार युनिटमध्ये ६५ किलोमीटर प्रतितास गतीने शंभर किलोमीटरचे अंतर पार करते. बाजारातील अनेक चायनीज बनावटीच्या बाईकला ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वदेशी उत्तम पर्याय ठरते आहे.
इंधनाचे दर गगनाला भिडत चालले आहेत. त्यामुळे पेट्रोल बाईक न परवडणारी झाली आहे. तसेच प्रदूषणाने उच्चांक गाठला असताना ही पर्यावरणपूरक स्कूटर प्रत्येकालाच आकृष्ट करत आहे. राकेशने यासोबतच इलेक्ट्रिक बुलेटवरही काम सुरू केले आहे. लवकरच तो हा आविष्कार जगासमोर आणणार आहे. राकेशने भुवनेश्वर येथील स्काय रायडर इन्स्टिट्यूट येथून ऑटोमोबाईल डिझाईनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंगचा कोर्स केला आहे. त्याचे वडील नागेश पेटकर यांचे गडचांदूर येथे स्वतःचे दुचाकीचे गॅरेज आहे.