Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

कोणत्या जिल्ह्यात काय सुरू काय बंद, नवी नियमावली वाचा एका क्लिकवर #Maharashtra #unlocked

मुंबई:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध लागू केले होते.

क्लिक करा
👇👇👇👇

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं राज्य सरकारनं निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचं 90 टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचं 70 टक्के लसीकरण झालंय याशिवाय 15 ते 18 वयोगटातील मुलांचं राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाण लसीकरण झालं आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या आदेशाचा 11 जिल्ह्यांना फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना सूट नव्या आदेशानं फायदा होणार आहे.
काय सुरु होणार?

राज्य सरकारनं निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना होणार आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांना दिलासा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्या जिल्ह्यातील 90% लोकांचा पहिला डोस पूर्ण हवे आहेत. जिल्ह्यात 70% लोकांचे दोन्ही डोस पूर्ण हवेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशानं चौपाट्या,गार्डन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

एस्सल वर्ल्डसारखे पार्क 50 टक्के क्षमतेनं

स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु

हॉटेल,थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार

सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु

लग्नासाठी 200 जणांना परवानगी

अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा आली

सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी

सर्व राष्ट्रीय पार्क आणि सफारी

पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार

ऑन लाईन तिकीट बुकिंग होणार

स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार

अम्युजमेंट/थीम पार्क 50 टक्के उपस्थितीत खुली होणार

वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थितीत सुरू होणार

सलून आणि ब्युटी पार्लर च्या नियम प्रमाणे स्पा 50 उपस्थितीत टक्के सुरु करण्याची परवानगी
रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह 50 टक्के उपस्थितीत सुरू

भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत हॉलमध्ये घेता येणार

लग्न समारंभ 25 टक्के लोकांच्या उपस्थितीत हॉल,

खेळाच्या स्पर्धा लोकांची 25 टक्के उपस्थिती

नाईट कर्फ्यू रात्री 11 ते सकाळी 5
आजपासून नवी नियमावली लागू

राज्य सरकारनं जाहीर केलेली नवी नियमावली आजपासून लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यानं ठाकरे सरकारनं लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या आस्थापना सुरु होतील तेथील कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं आवश्यक आहे. तर, येणाऱ्या ग्राहकांचं देखील लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे. येत्या काळात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवे आदेश लागू केले जाणार आहेत.आजपासून नवी नियमावली मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लागू होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत