Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

गडचिरोली-चंद्रपुर मार्गावर "द बर्निंग कार" #accident #fire #firenews


सावली:- सावली तालुक्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या जवळ कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या एक इलेक्ट्रिक पोलला धडक दिल्याने एका व्यक्ती जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. #saoli

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली-चंद्रपुर मार्गावरील सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या एका इलेक्ट्रिक पोलला मूलकडे जाणाऱ्या कारने धडक दिल्याने कारला आग लागल्याची शंका वर्तविली जात आहे. #Saolinews
सदर आगीमुळे कारमधून सर्वत्र धुर पसरले. सदर वाहनाच्या काही अंतरावर देवीलाल यादव य 35 वर्षे रा. कांकेर जि. छत्तीसगड यांचे मृत्तदेह आढळून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिष बोरकर व पोलीस पथक दाखल झाले. अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही पुढील तपास सावली पोलीस करीत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत