Top News

अखेर ११ दिवसानंतर बेरोजगार व मनसेच्या बेमुदत उपोषण पालकमंत्र्यांच्या मध्यस्तीने सुटले #Chandrapur


चंद्रपूर:- जिल्हयातील स्थानिक भुमीपुत्रना उद्योग, कंपन्या व वेकोली अंतर्गत खाजगी कंपन्यामध्ये नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या ११ दिवसापासून आमरण उपोषण करणाऱ्या बेरोजगारांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपोषण मंडपात भेट देवून संपूर्ण मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उपोषणकत्यांना ज्युस पाजून उपोषण सोडण्यात आले.

यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी वेकोली मुख्य प्रबंधकाला निर्देश देऊन खाजगी कंपन्यात परप्रांतीयांना कामावर ठेवण्या पेक्षा स्थानिकांना घेण्यात यावे. अन्यथा मी स्वता येऊन कंपनी बंद केल्या शिवाय राहणार नाही असा इशारा दिला.
स्थानिक बेरोजगार व मनसे नेता मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषणाला माजी मंत्री सुधिर मुनगंटीवार, जन विकास सेना अध्यक्ष नगरसेवक पप्पु देशमुख, नऊ पक्ष नगरसेवक अजय सरकार, पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार, मुस्लीम संघटना आदिंनी भेट देऊन आंदोलनाला पाठिया दिला. याबद्दल मनसे नेता मनदिप रोडे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी आंदोलनाकत्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. गेल्या ११ दिवसापासून संघर्षाला अखेर विजय मिळाला असून जिल्हयातील भूमिपुत्र स्थानिक बेरोजगारांना उद्योगात नौकरी मिळण्याची मागणी पूर्ण झाली आहे. याबद्दल बेरोजगारांनी जल्लोश करून आनंद व्यक्त केला. यावेळी उपोषण आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी उपोषणकर्ते अमोल पिंपळशेंडे, मंगेश तुमसरे, पंढरी तुमसरे, आकाश डागरे, महारत्न लोहकरे, संदीप अरडे, रोशन बदकी, सहुल मडावी, सुमित करपे शहर सचिव मनसे, शहर उपाध्यक्ष नवाज शेख, शहर उपाध्यक्ष समिर शेख, बाळा चंदनवार, म.न. जनहित कक्ष विधी विभाग जिल्हा अध्यक्ष राजू बघेल, असलम खान शहर अध्यक्ष चाहतुक सेना, राकेश हनुमंते, नितेश जांभुळकर, ब्रिजनंदन मांजी, नरेंद्र गूगल,चंद्रकला कुराणकर, संगीता धांत्रक, स्वाभी राऊत, शारदा फरोदी, संगीता तुरनकर, राजेंद्र तुमसरे, गजानन वानखेडे, कैलास लांबट, सुरज दाते, योगेश्वर मेश्राम, सुरज तुरणकर, विश्वनाथ चौवले, प्रेम कुमार गुगल, शुभम बोचले. अनिकेत उताने. स्वप्नील भडके, अजय दामीरी, सुमित खोडनकर, श्रीकांत सुदरगीरी, प्रशांत खामत, वसीम योगेश शेडमाके, अनिता तुमसरे, धनराज तुमसरे, स्वप्नील तुमसरे, शंकर भटारकर आदी मनसे पदाधिकारी मनसैनिक व बेरोजगार उपस्थित होते.
👍

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने