Top News

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचा अवमान प्रकरणी निषेध सभा #pombhurna

पोंभूर्णा:- ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले चौक, येथे संपूर्ण माळी समाज, सामाजिक संघटना व राजकीय पक्षातर्फे पोंभूर्णा भाजपातर्फे पदग्रहण कार्यक्रमाच्या लगत असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा फलकाच्या समोर डेकोरेशन पळद्याने झाकून ठेवल्याबद्दल व राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध सभा घेण्यात आली.
या सभेला माळी समाजाचे सद्गुरु ढोले, श्रीकांत शेंडे, दयानंद गुरनुले, ऋषि गुरनुले, नल्लू गुरनुले, मुर्लीधर गुरनुले, निखिल गुरनुले, नानाजी गुरनुले, प्रमोद गुरनुले, नगर पंचायतचे गटनेते आशिष कावटवार, शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार, कॉंग्रेसचे अतिक कुरेशी, अशोक गेडाम, धम्मा निमगडे, राष्ट्रवादीचे भुजंग ढोले, बहुजन वंचितचे नगरसेवक अतुल वाकडे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष अविशकुमार वाळके, शिवसेना नगरसेवक अभिषेक बद्दलवार, बालाजी मेश्राम, व आदी पदाधिकरी आपल्या मनोगतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा चौकातील नाम प्रतिमा फलकाला भाजपातर्फे घेण्यात आलेला नगराध्यक्ष, उपाध्यक्षाचा पदग्रहण कार्यक्रम आ. सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. आयोजकाने केलेला या कृतीचा निषेध सोशल मीडियाच्या माध्यमातून केला गेला.
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले चौकाचा विषय नगरपंचायत च्या पहिल्या सभेत ठराव घेऊन पारित करा असे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यावेळी माळी समाजाचे अध्यक्ष कल्पना गुरनुले, बेबीबाई कोकोडे, कमलबाई कावळे, कुसुम कोकोडे, सुमनबाई कावळे, अनिता गुरनुले, योगिता गुरनुले, रेखा गुरनुले, सईबाई गुरनुले, सुंदराबाई गुरनुले, वैशाली गुरनुले, कल्पना शेंडे, विजया गुरनुले, तेजस्विनी शेंडे सर्व समाज बांधव व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने