Top News

बल्‍लारपूर येथे भव्‍य नेत्र चिकित्‍सा शिबीर संपन्‍न #ballarpur

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नातुन नेत्र चिकित्‍सा शिबीर यशस्‍वी
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
बल्लारपूर:- रुग्‍ण सेवा हीच ईश्‍वर सेवा आहे. असे मानुन बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्‍लारपूर येथे नेत्र तपासणी शिबीराचे यशस्‍वी आयोजन करण्‍यात आले. यावेळी नेत्र चिकित्‍सा शिबीराचा हजारो गरीब व गरजु नागरिकांनी नेत्र तपासणी करुन  लाभ घेतला.

दि. १५ मार्च २०२२ रोजी सुभाष हॉल बस स्‍टॅंडचे बाजुला श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था चंद्रपूर द्वारा आयोजित व विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नातुन नेत्र चिकित्‍सा शिबीराचे यशस्‍वी आयोजन करण्‍यात आले. यावेळी प्रामुख्‍याने उद्घाटक म्‍हणून भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनभैय्या चंदेल, प्रमुख उपस्थिती माजी नगराध्‍यक्ष हरिश शर्मा, भारतीय जनता पार्टी बल्‍लारपूर शहर अध्‍यक्ष काशिनाथ सिंह, , भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, राजेश सुरावार, मनिष पांडे, शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, समिर केने, राजू दारी, सौ. रेणुका दुधे, सौ. वैशाली जोशी, रणंजय सिंह, देवेंद्र वाटकर, सतिश कनकम, घनश्‍याम बुरडकर, किशोर मोहुर्ले, स्‍वामी रायबरम, महेंद्र ढोके, सौ. जयश्री मोहुर्ले, सौ. सुवर्णा भटारकर, सौ. सारीका कनकम, येलय्या दासरफ, अरुण वाघमारे, मोहीत डंगोरे, सौ. संध्‍या मिश्रा, सौ. आरती आक्‍केवार, सौ. सुरेखा श्रीवास्‍तव, जुम्‍मन रिझवी, राजेश दासरवार, करिम शेख, राजकुमार श्रीवास्‍तव, अरुण भटारकर, विरेंद्र श्रीवास्‍तव, सलिम अहमद, विकास दुपारे, संजय मुप्‍पीडवार, अरविंद दुबे, छगन जुलमे, साई अरगेलवार, राहुल कोंतावार, नयन बोम्‍मावार, सईदा शेख, श्रीनिवास कंदकुरी, अजहर शेख, दिनेश कोपुलवार, श्रीमती सरला लांडे, सौ. त्रीशाली लांजेवार, सौ. प्रिती रंगारी, मंगेश चहारे, अमन बन्‍सेल, प्रकाश जगपुरे, मिथीलेश खेंगर, अब्‍दुल आबीद, रोहीत गुप्‍ता, सौ. अर्चना हिरे इत्‍यादी आणि इतर असंख्‍या कार्यकर्त्‍यांनी शिबीराच्‍या यशस्‍वीतेसाठी सहकार्य केले.
या शिबीरामध्‍ये ३ हजार नागरिकांची नेत्र तपासणी करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये ११२५ नागरिकांना दि. ३० मार्च २०२२ रोजी चष्‍मे वाटप करण्‍यात येईल, यावेळी १५० नागरिकांना मोतीबिंदु झाल्‍याचे निदान झाले. त्‍यामधून ५८ नागरिकांना मोतीबिंदुच्‍या शस्‍त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे पाठविण्‍यात आले, उर्वरित ९२ नागरिकांना पुढील आठवडयात शस्‍त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे पाठविण्‍यात येणार आहे.
 शिबीराला कस्‍तुरबा हॉस्‍पीटल सेवाग्राम येथील नेत्रतज्ञ चमुच्‍या माध्‍यमातुन नेत्र चिकित्‍सा करण्‍यात आली. यापूर्वी मा.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात नेत्र चिकित्‍सा शिबीरांचे आयोजन करण्‍यात आले असुन सुमारे ३१ हजाराच्‍या वर नागरिकांना मोफत चष्‍मे वितरीत करण्‍यात आले असुन १५ हजाराच्‍या वर मोफत मोतीबिंदु शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत. विकासकामांचा झंझावात सुरु असताना सामाजिक जाणीव जपत अनेक आरोग्‍य शिबीरांचे सातत्‍याने यशस्‍वी आयोजन करण्‍यात येते आहे. विधानसभा बल्‍लारपूर क्षेत्राचा चेहरामोहराच बदलवुन टाकणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने