Top News

आपण आत्मनिर्भर झालो तर देश आत्मनिर्भर होईल:- किरण बुटले #chandrapur


पाककला स्पर्धा व आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांचा सत्कार

चंद्रपुर भाजपा आत्मनिर्भर भारतचा उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी विविध योजना लागू करीत कौशल्य वृद्धीसाठी मार्ग मोकळा केला आहे.आता फक्त आपल्या इच्छाशक्तीची गरज आहे.लोकनेते आ सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात,जनहिताच्या सर्व योजना शेवटच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचवू.आपण आत्मनिर्भर झालो तर देश आत्मनिर्भर होईल,असे प्रतिपादन चंद्रपूर भाजपा असत्मनिर्भर भारतच्या जिल्हाध्यक्ष किरण बुटले यांनी प्रस्ताविकातून केले.
त्या चंद्रपूर भाजपा आत्मनिर्भर भारत व
श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातर्फे शनिवार (12मार्च) ला भानापेठ वार्ड येथे जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित 'पाक कला स्पर्धा व आरोग्य शिबिरात बोलत होत्या.


यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.मंगेश गुलवाडे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,स्त्रीरोग तज्ञ डॉ. वृषाली बोनगुलवार, डॉ सौ खुशबू गुजराती व ऍड सारिका संदूरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ गुलवाडे म्हणाले,प्रत्येक व्यक्तींमध्ये एक सुप्तगुण असतो.त्यास वाव मिळाला की कलेचा जन्म होतो.ही कला त्यास आत्मनिर्भर होण्यास मदत करते.

यावेळी पाककलेचा प्रिया पवार यांना प्रथम,रश्मी चिद्दमवार यांना द्वितीय तर रिया निमजे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.परिसरातील किमान 280 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत निशुल्क तपासणी करून घेतली.यावेळी उपस्थित,हेल इन द सेल रोबोवार स्पर्धेतील विजेते अक्षय खनके, सोहम बुटले, सोनू सिंग, वैष्णवी बुटले, सिद्धी तेलंग,टिकांचंद बुटले यांचा तर श्रेया श्रीकांत पवार, रश्मी रतन परिहार, मुस्कान अनुपम भगत यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रसंगी परीक्षक म्हणून भुवनेश्वरी धर्मपुरीवार,किशोर पवार,नंदा कामननवार,तुम्मे व रिकु यांनी जवाबदारी सांभाळली.यावेळी रणजित डवरे,प्रवीण पवार,मनोज पवार,श्रीकांत देशमुख,शुभम सराफ,शुभम शेगमवार, यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन सुजाता साहू यांनी केले,तर वैशाली पवार यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने