Top News

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांनी केमारा येथील क्रीडांगण च्या परिसराचे प्रिकास्ट व्हालकंपाऊंडचे केले भूमिपूजन #pombhurna

गट ग्रामपंचायत बोर्डा बोरकर येथे पिण्याच्या पाण्याचे कॅन चे वितरण
पोंभुर्णा:- आज दिनांक १७ मार्च ला माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली केमारा येथील जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत क्रीडांगण च्या सभोवताल परिसराच्या प्रिकास्ट व्हालकंपाऊंड चे भूमिपूजन केमारा-देवाडा खुर्द जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य राहुल संतोषवार यांच्या हस्ते करण्यात आले.
केमारा हे गाव आदिवासी बहुविपुल गाव आहे, क्रीडांगणला लागून जंगल असल्याने जंगली हिंसक प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने गावातील नागरिकांनी मागणी लक्षात घेताच राहुल संतोषवार यांनी प्रिकास्ट व्हॉलकंपाऊंड चे काम मंजूर केल्याने नागरिकामध्ये आनंद दिसुन आले.
यावेळी सरपंच सचिन पोतराजे, सदस्य प्रेमदास इष्टाम, मीरा पोरेते, मंजुषा आलाम, क्रीडा मंडळ चे संपूर्ण सदस्य, जेष्ठ नागरिक बापूजी शेडमाके, अविनाश शेडमाके, महादेव पोरेते, संजय आत्राम, तुकाराम बावणे, रवी उईके, रमेश शेडमाके, विजय शेडमाके व इतर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गट ग्रामपंचायत बोर्डा बोरकर येथे जिल्हा निधी पंचायत राज अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पिण्याच्या पाण्याचे कॅन मंजूर करून त्याचे वितरण राहुल संतोषवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच बालाजी नैताम हे उपस्थित होते. बोर्डा बोरकर ग्रामपंचायत ला बोर्डा दिक्षित, गंगापूर नवीन हे गाव समाविष्ट आहेत. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कॅन दिल्याने पिण्याचे पाणी शुद्ध राहण्यास निश्चित मदत होऊन गावातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहतील गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला कॅन मिळाल्याने गावातील नागरिकांमध्ये आनंद दिसून आले.
यावेळी उपस्थित उपसरपंच महेश कोसरे, ग्रामपंचायत सदस्य रोशन नैताम, कविता मंडरे, कुनघाडकर, बालचंद कुलमेथे, बंडू नैताम, नारायण गेलकिवार व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल संतोषवार हे नेहमी जनकल्यानाचा ध्यास घेऊन विकासाभिमुख कामे करून जिल्हा परिषद क्षेत्राचा विकास अविरत करीत आहेत. आज सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन लोककल्याणाची कामे केली जात असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून ते गावाचा सर्वांगीण विकास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने