Top News

चंद्रपुरात रोजगारासाठी उपोषणकर्त्यांनी बांधले बेशरमाचे तोरण #chandrapur

१० दिवसांपासून आंदोलन, आंदोलकाची प्रकृती चिंताजनक
चंद्रपूर:- जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी काही तरूण-तरुणींनी बेमुदत उपोषण पुकारले. सात मार्चपासून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला १० दिवस उलटले. मात्र, अद्यापही प्रशासनाची नजर उपोषणकर्त्यांवर पडली नाही. मागणी फार मोठी नाहीच. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक कंपन्या आहेत. त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे, ही माफक मागणी आहे. काही उपोषणकर्त्यांवर प्रकृती चिंताजनक आहे. रोजगारासाठी अंतिम टोकापर्यंत पोहचायला मनसे आणि स्थानिक तरूण, तरुणी तयार झालेत. तेही औद्योगिक जिल्ह्यात..! कंपनीत परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात आहे, तर दुसरीकडे भूमिपुत्रांना रोजगारासाठी आंदोलन करावे लागावे. यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती?


जिल्ह्यातील बेरोजगर गेल्या दहा दिवसा पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले असताना जिल्हा प्रशासन साधी दखल हि घेण्यास तयार नसल्याने अखेर संतप्त होऊन उपोषणकर्त्यांनी दि. १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेशरमाचे तोरण बांधून प्रशासनाचा तिव्र निषेध केला.

बेशरमाच्या झाड पाहून हि जर जिल्हा प्रशासनाला जाग आली नाही, तर उपोषण मंडपात बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्या शिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. आंदोलनात शेकडो बेरोजगर व त्यांच्या परिवारातील सदस्य महिला मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील उद्योग तसेच वेकोली अंतर्गत खाजगी कंपनीत स्थानिक भूमिपुत्र बेरोजगरांना रोजगार न देता परप्रांतियांना रोजगार दिला जात आहे. यामुळे स्थानिक युवक बेरोजगरिचा प्रश्न गभीर बनला आहे. शासनाने उद्योगात ८० स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणी साठी बेरोजगरांनी "करो या मरो" आंदोलन छेडून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने उपोषण कर्त्यांनी तिव्र आंदोलनास सुरुवात केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने