Top News

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार करुया:-जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे #pombhurna

पोंभूर्णा तालुका शिवसेना पदाधिकरी आढावा बैठक संपन्न
पोंभूर्णा:- होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या आढावा या संदर्भात जिल्हा शिवसेना प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य संदीप गिर्हे यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक भागृहात येथे संपन्न झाली.

या आढावा बैठकीत निवडणूकीच्या संदर्भाने कार्यकर्त्यानी केलेली कामे, पक्षबांधणी संदर्भात चर्चा व विचारविनिमय,पक्षात सदस्य संख्या वाढविण्यासंदर्भात रणनिती, आगामी होणाऱ्या जि.प. व पं.स. निवडणुका दृष्टीने पक्षाची बांधणी व योग्य उमेदवाराची चाचपणी या विषयावर आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षपदी शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे होते तर प्रमुख उपस्थिती शिवसेना तालुका प्रमुख तथा गटनेता न. पं. आशिष कावटवार, शहर प्रमुख गणेश वासलवार, युवासेना सरचिटणीस विक्रांत सहारे, महिला तालुका प्रमुख तथा आष्टा ग्रा.पं. सरपंच किरणताई डाखरे, महिला शहर प्रमुख कांताबाई मेश्राम, डॉ. अमोल बावणे, नगरसेवक अभिषेक बद्दलवार, बालाजी मेश्राम, रामेश्वरी वासलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

महिला संघटन, युवा कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश बाबत व होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी करण्याबाबतीत चर्चा करण्यात आली.

यावेळी घनोटी तुकुमचे सरपंच यशोदा ठाकरे, वेळवा माल ग्रामपंचायत सरपंच सिमा निमसरकार, चेक हत्तीबोडी ग्रामपंचायत सरपंच संगीता कुडमथे, दिघोरी ग्रामपंचायत सरपंच वनीता वाकूडकर, थेरगाव ग्रामपंचायत उपसरपंच वेदनाथ तोरे वेळवा ग्रा.पं.उपसरपंच जितेंद्र मानकर, दिघोरी उपसरपंच,व शंकर वाकूडकर, घाटकूळचे उपसरपंच गंगाधर गद्देकार, शिवसेना समन्वयक विजय वासेकर, ईलाजभाई, ग्रा.पं.सदस्य विकास बरांडे उपतालुका प्रमुख जीवदास गेडाम, रविंद्र ठेंगणे, युवासेना शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार, मुना लोणारे, सुनिल कावटवार विभाग प्रमुख लोकाजी दामपेल्लीवार, संदीप सुमटकर, संदिप ठाकरे, किशोर डाखरे, अशोक बोलीवार, आशिष कावडे, रणपती वडस्कर, भावीका मडावी, निता मानकर, रोहिनी देवताळे, मेघा मानकर, अर्चना कोसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा ज्योतीबा फुले सभागृहात येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने